रविकुमार बंडीवार नांदाफाटा प्रतिनिधी : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 27 डिसेंबर पासून नागपूर येथील संविधान चौकात विदर्भवादी नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांच्यासह अन्य नेते आमरण उपोषणाला बसलेले आहे या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष तालुका कोरपणाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या वनोजा पू लावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी तब्बल दोन तास वाहतूक रोखुन धरली. यामुळे ट्रक सह इतरही वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. आंदोलनात स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी सभापती नीलकंठ कोरांगे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण नवले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बावणे माजी संचालक भास्कर मते माजी सरपंच सचिन बोंडे हिरापूरचे उपसरपंच अरुण काळे रत्नाकर चटप अनील चटप निलय झुरमुरे संजय मडावी विलास आगलावे,मोहन देरकर,युवा कार्यकर्ते विपिन लोहे,निलेश चिंचोलकर, आदिंसह शेकडो कार्यकर्त उपस्थित होते. आज नागपूरकडे होणार शेकडो कार्यकर्ते रवाना ..स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ॲड. चटप यांच्या समर्थनार्थ आंदोलन तीव्र करण्याच्या हेतूने आज 1 जाने.रोजी कोरपणा राजूरा गोंडपिपरी जिवती तालुक्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते नागपूर येथे रवाना होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते सुनील बावणे यांनी यावेळी दिली .
Related Posts
गुरु नानक महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
लोकदर्शन 👉 शुभम पेडामकर कॉलेज म्हंटल की आली ती दंगामस्ती, दंगामस्ती सोबत चातक पक्ष्याला जशी पावसाची ओढ असते तसेच विद्यार्थ्यांना वेध लागतात ते महोत्सवांचे. अभ्यासासोबत वैविध्य उपक्रम करायला विद्यार्थ्यांना फार आवडतात आणि याच उप्रकमातून विद्यार्थी देखील…
कांद्याच्या अनुदानात लाल कांदा आणि ई पिक पाहाणीची मेख संजय शिंदे
लोकदर्शन बीड ;👉राहुल खरात शासनाने दिनांक २७ मार्च रोजी २०२३ रोजी शासन निर्णय काढून कांदा शेतकऱ्यांना प्रती क्विंटल रक्कम रू. ३५० प्रामणे अनुदान देण्याचे प्रसिध्द केलेले आहे व त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. पण…
श्रीमती कुसुमदेवी शर्मा यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तीमत्व हरपले – सुधीर मुनगंटीवार*
लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष श्री. हरीश शर्मा यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमदेवी शर्मा यांच्या निधनाने भाजपा परिवारातील ज्येष्ठ सदस्य व मातृतुल्य व्यक्तीमत्व हरपल्याची शोक भावना चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.…