,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
भगवान बाबा नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री गुरुदेव दत्तात्रय जयंती निमित्ताने श्री गुरु चरित्र पारायण चे आयोजन 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर पावेतो चे करण्यात आले होते,या पारायण मध्ये 156 पुरुष व महिलांनी सहभाग घेतला,
प्रत्येकाला भूतलावर जन्म घेतल्यानंतर कर्म करावेच लागते, संसाराच्या भवसागरातून पैलतीरी जाण्यासाठी सर्वात सोपे साधन म्हणजे नामसंकीर्तन ,सुसंस्कृत आणि चारित्र्य संपन्न समाज घडविण्यासाठी हे उत्तम केंद्र आहे,
या सप्ताहात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,दररोज सकाळी गुरू चारित्र्य पारायण चे वाचन सौ तारा गजानन राव डोईफोडे यांनी केले, तसेच भागवत पारायण चे वाचन जिजा मांटे, यांनी केले, श्रीपाद श्रीवल्लभ चे वाचन गायत्री राऊत यांनी केले तर नवनाथ पारायण चे वाचन सौ दौंड यांनी केले, 27 डिसेंबर ला सप्ताहा चा समारोप महाप्रसाद कार्यक्रमा ने झाला,हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला,सप्ताह चे नियोजन केंद्राचे प्रमुख शिवानंद मांटे, बालसंस्कार केंद्र प्रमुख सौ ज्योती मांटे ,याज्ञीकी प्रश्नोत्तरे प्रमुख गाडेकर काका व इतरांनी उत्कृष्ट रीत्या कार्य केले,