नांदा फाटा: रविकुमार बंडीवार नांदा फाटा
ग्राम पंचायत हिरापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदा व अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७.१२.२०२३ रोज बुधवार ला हिरापूर येथे कार्यालय ग्रामपंचायत हिरापूर च्या प्रांगणामध्ये आरोग्य शिबिर संपन्न झाले. आरोग्य शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त मुख्यध्यापक श्री. वाघमारे गुरुजी यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरापूर ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री. अरुण काळे, तर विशेष अतिथी म्हणून ग्रामपंचायत माजी सरपंच तथा सदस्य श्री. प्रमोदजी कोडापे, ग्रा. पं. सदस्य दुर्योधनजी सिडाम, डॉ. संकेत शेंडे, डॉ.लदांडेकर मँडम, अल्ट्राटेकचे सी.एस.आर. प्रमुख प्रतीक वानखेडे साहेब, आरोग्य सेवक राठोड, आरोग्य सेविका झाडे मँडम, माजी तंटामुक्त अध्यक्ष विशाल पावडे, सौ. मोरे, ममता खेलूरकर, आशा सेविका सौ. उषा वाघमारे, संगीता वानखेडे, संगीता तोडसाम, देविदास मांदाळे, ग्रामपंचायत पेसा मोबिलायझर सुवर्णा सिडाम, ग्रामपंचायत कर्मचारी प्रतीक लेडांगे आदी उपस्थित होते.
हिरापूर ग्रामस्थांनी बहुसंख्येने या आरोग्य शिबिरात तपासणी करत १०४ ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला.