“अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे आयोजन”
विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच खेळामध्ये विशेष आवड निर्माण व्हावी व त्यातून उत्तम खेळाडू घडावे याकरिता अंबुजा सिमेंट फाउंडेशन व जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोपालपुर येथे दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांकरिता खो खो,कबड्डी,रिले,१०० मीटर रनिंग,२०० मीटर रनिंग, गोळा फेक,लांब उडी यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह,विशेष पारितोषिक,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाला अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे विभागीय व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे, अंबुजा सिमेंट फाउंडेशन च्या सिनियर मॅनेजर शुभांगी सोहनी,सरपंच किशोर वेडमे , विस्तार अधिकारी मनोज गौरकार, केन्द्रप्रमुख पंढरी मुसळे,प्रकल्प समन्वयक जितेंद्र बैस,शाळा व्यवस्थापन समितीचे नागोराव मडावी, माजी सरपंच पुष्पा आत्राम, माजी.ग्रा. पं.सदस्य सुंगा तोडासाम,अंबुजा सिमेंट फाउंडेशन च्या शिक्षण विभाग समन्वयीका सरोज अंबागडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अनिकेत दुर्गे,उमेश आडे यांनी तर आभार
गोपालपुर येथील शिक्षक संदिप पोरेते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संपूर्ण गोपालपुर येथील ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.