बिबीचा अफरोज शेख नेपाळमध्ये खेळणार राष्ट्रीय फुटबॉल

 

by : Shankar Tadas

कोरपना – कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम, बिबी येथील अफरोज रहीम शेख या तरुणाची नेपाळमधील पोखारा येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवारपूरचा तो इयत्ता बारावीचा विद्यार्थी आहे. युवा फुटबॉल स्पोर्टिंग असोसिएशन, वणी या संघाकडून तो खेळणार असून नेपाळला जाण्यासाठी आज (दि. २८ ला) रवाना झाला आहे. हैद्राबाद येथे झालेल्या फुटबॉल स्पर्धेत त्याने आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती. विदेशात खेळण्यासाठी त्याच्या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here