गुरु गोविंदसिंह यांच्या पुत्रांचे बलिदान राष्ट्र व युवकांसाठी सदैव प्रेरणादायी : हंसराज अहीर

by : Devanand Sakharkar 

चंद्रपूर : खालसा पंथाचे दहावे गुरु गोविंदसिंहजी यांची अल्पवयीन मुलांच्या शहादतीच्या स्मरणार्थ आज संपुर्ण देश वीर बाल दिवस साजरा करुन त्यांच्या पंथ व देशाभिमानास अभिवादन करीत आहे. साहबजादे बाबा जोरावर सिंह जी व बाबा फतेह सिंह जी यांची शौर्याची शहीद गाथा वर्तमान व भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील असे विचार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. दि. 26 डिसेंबर रोजी श्री गुरुद्वारा गुरु सिंह सभाव्दारा खालसा कॉन्व्हेंट येथे आयोजित ‘वीर बाल दिवस’ निमित्त आयोजित कार्यक्रमास गुरुव्दारा गुरुसिंह सभेचे अध्यक्ष चमकोरसिंह लाठी बसरा, बंटी भाटीया, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, प्राचार्य सिमरन कौर, माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, विनोद शेरकी, सरवनसिंह (पंगू) सलुजा, पुनम तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी हंसराज अहीर म्हणाले की, माननिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी 9 जानेवारी रोजी गुरु गोविंदसिंह यांच्या प्रकाश पर्व प्रसंगी वीरपुत्रांच्या स्मरणार्थ वीर बाल दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती.
देशात शासकीय व सामाजिक स्तरावरुन हा दिवस साजरा होत असून तो समस्त बालकांना प्रेरणा देणारा असल्याचे सांगत अहीर यांनी गुरु गोविंदसिंह जी यांच्या दोन्ही पुत्रांचे हौतात्म्य पंथ रक्षणार्थ असल्याने त्यांच्या या शौर्याच्या हौतात्म्याचे देशाला अनादीकाळ स्मरण होत राहील मुघलांनी ज्या क्रुरतेने या बालकांना भिंतीत दफन करीत त्यांचे आयुष्य संपविले त्यातून प्रेरणा घेत देशासाठी लढा देणारे अनेक शुरवीर योध्दे निपजतील असेही अहीर यांनी सांगितले तत्पूर्वी हंसराज अहीर यांनी गुरुव्दारात माथा टेकुन गुरुग्रंथ साहीब ग्रंथाचे दर्शन घेतले. यावेळी या दोन्ही वीर बालकांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी अनेक मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास बहुसंख्य बालक-बालिका, शिक्षकवृंद व संस्थेचे सन्माननिय पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here