धामणगावजवळ पुन्हा अपघात, बाईकस्वार युवकाचा मृत्यू, एक गंभीर

by : Shankar Tadas

गडचांदूर : धामणगाव येथे सलग दुसरा अपघात झाला असून पुन्हा एका बाईकस्वार युवकाने प्राण गमावले आहे. कोरपना येथून गडचांदूरकडे दोघे दुचाकीस्वार येत असताना निर्माणाधीन पुलात बाईक कोसळली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना 27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता घडली. रूपापेठ खडकी ता. कोरपना येथील हे दोन्ही युवक होते. 15 दिवसापूर्वी येथून जवळच बाईकस्वाराचा अपघातात मृत्यू झाला होता. महामार्गाचे काम सुरू असून अनेक ठिकाणी रस्त्याचा अंदाज घेणे कठीण होत असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. नागरिकांनी सावधगिरीने वाहने चालविणे आवश्यक असून संबंधित यंत्रणेने अपघात होणार नाही याकरिता खबरदारी घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here