ABPS शाळेत राष्ट्रीय गणित दिन साजरा*

 

लोकदर्शन गडचांदूर…👉 प्रतिनिधी

स्थानिक आदित्य बिर्ला पब्लिक स्कूलमध्ये 22 डिसेंबर 2023 रोजी महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका अर्चना गोलचा, पालक प्रतिनिधी श्रीमती स्मिता राठी आणि गणित विभागाच्या शिक्षकांनी माता सरस्वती आणि रामानुजन यांच्या छायाचित्रांवर पुष्प अर्पण करून केली.

विभागप्रमुख अरविंद यादव यांनी गणित विषयाचे महत्त्व व प्रासंगिकता सविस्तरपणे अधोरेखित केली. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, लघुनाटिका, गाणे, नंबर्स गेम आदी उपक्रमांचे स्तुत्य सादरीकरण करून कार्यक्रमात भर घातली. कार्यक्रमाच्या यशस्वितेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. मॅथेमॅटिक्स क्लबचे प्रभारी मधुकर धारपुरे यांनी आभार व्यक्त केले. प्राचार्यांनी सहभागियांचे मनमोकळेपणे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here