लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– विवेकानंद नगर, राजुरा येथील शुभम भाऊजी पोटे यांनी २०२३ मध्ये युपीएससी च्या वतीने घेण्यात आलेल्या आय. इ. एस. परिक्षेत राष्ट्रीय पातळीवर ११ वा क्रमांक प्राप्त करून असिस्टंट एज्झीकेटव इंजिनियर म्हणून भारत सरकार च्या इंडियन टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसमध्ये आय इ एस आॅफिसर पदी निवड झाल्याबद्दल लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते यांच्या हस्ते त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट घेऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी प. स. सभापती कुंदाताई जेणेकर, शुभम चे वडील भाऊजी पोटे, आई माधुरी पोटे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शुभम पोटे आणि कुटुंब मुळचे सुब्बई येथील असून मागील अनेक वर्षांपासून राजुरा येथे वास्तव्यास आहेत. शुभम शालेय जीवनापासूनच कुशाग्र बुध्दी आणि गुणवंत विद्यार्थी असून त्यांनी गेट परिक्षेत १५० वा रँक प्राप्त करून चेन्नई येथे एका नामांकित कंपनीत (कल्पकम) वैज्ञानिक म्हणून सेवा देत असतांनाच युपीएससी ची तयारी करून हे यश संपादित केले हे विशेष.