by : Ganesh Bhalerao
नाशिक : टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 3 री ज्युनिअर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा सय्यद पिंपरी क्रीडा संकुल उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये प्रथम क्रमांक रत्नागिरी, द्वितीय
क्रमांक सातारा जिल्हा, तृतीय क्रमांक नाशिक तसेच मुलींमध्ये पहिला क्रमांक धाराशिव, द्वितीय क्रमांक नंदुरबार ,तृतीय क्रमांक नाशिक संघ यांना मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी ,नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड,महेश मिश्रा ,विलास गिरी, परभणी जिल्हा सचिव मुजीब शेख सांगली जिल्हा सचिव विजय बिराजदार कोल्हापूर जिल्हा सचिव राजेंद्र सर
व जिल्हा सचिव, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षण इत्यादी उपस्थित होत, महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट सचिव मिनाक्षी गिरी यांनी खेळाडूंना टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले.
3 री राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नाशिक मधील सय्यद पिंपरी तालुका क्रीडा संकुल।मैदानावर येथे संपन्न झाली या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे 21 संघ व मुलींचे सात संघानी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा अंतिम सामना रत्नागिरी विरुद्ध सातारा जिल्हा यांच्या झाला .रत्नागिरी संघाने विजयश्री मिळवला तर सातारा संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला.. तसेच नाशिक संघाला तिसरा क्रमांक
मिळाला व मुलींमध्ये पहिला क्रमांक धाराशिव, दुसरा क्रमांक नंदुरबार तिसरा क्रमांक नाशिक,
यांनी मिळवला या स्पर्धेमध्ये सर्व उत्कृष्ट फलंदाज मॅन ऑफ द सिरीज सत्यम पांडे (नाशिक,) मिळवल्याबद्दल व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी, विलास गिरी ,स्वप्निल ठोंबरे ,महेश मिश्रा, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.तसेच ..सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानाचा फेटा असे स्वरूप होते मान्यवरच्या पाहुण्यांच्या शुभहस्तेबक्षीस वितरण करण्यात आले पंच म्हणून.
संदीप पाटील, धनश्री गिरी विजय उंबरे, लखन देशमुख, श्रीपाद, अर्जुन सिद्धेश गुरव, सोमनगवडा बिरादार, शुभम जगताप पंकज सुर्वे धनंजय लोखंडे,, सुनील मोरय यांनी काम बघितले.