कोरपना येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी समारोहाचे भव्य आयोजन

by : Shankar Tadas

कोरपना :
श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय तैलिक विकास संस्था कोरपना यांच्या वतीने 20 डिसेंबर रोजी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी समारोहाचे भव्य आयोजन करण्यात आले. कोरपना शहरात मोठ्या भक्तीभावाने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची पालखी राम मंदिर ते नवनिर्मित संत संताजी जगनाडे महाराज मंदिरापर्यंत काढण्यात आली, श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत मंडळाच्या महिलांनी स्वागत गीताने केले. संत संताजी जगनाडे महाराज मंदिर निर्मिती करिता आर्थिक दान देणाऱ्या प्रमुख व्यक्तीचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुरलीधर गिरडकर सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि उपाध्यक्ष महाराष्ट्र न्यायिक प्राधिकरण बेंच नागपूर, कार्यक्रमाचे उद्घाटक गणपतराव गिरडकर ज्येष्ठ नागरिक तथा पोस्ट मास्तर कोरपना, प्रमुख अतिथी गजानन खामनकर, विजयराव बावणे संचालक जि. म.स. बँक चंद्रपूर, रामदासजी गिरटकर जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर, अशोकराव बावणे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना, नंदाताई बावणे नगराध्यक्षा नगरपंचायत कोरपना, संस्थेचे अध्यक्ष धनराज गिरडकर, संस्थेचे सचिव उद्धवकुमार तडस, पुंडलिक गिरसावळे, संजय ठावरी सर, भारत चन्रे, पंढरीनाथ चन्ने, डॉ. शंकर गिरटकर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती मुरलीधर गिरडकर यांनी तेली समाज बांधवांना शिक्षण घेण्याचे आणि प्रत्येक क्षेत्रात जिद्दीने पुढे जाण्याचे आवाहन केले. मेहनत केल्याशिवाय स्वन पूर्ण होत नाही. सातत्य असेल तर योग्य सन्मान प्राप्त होईल असेही त्यांनी आपले स्वतःचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. तीन महिन्यात श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची मूर्ती लोकार्पण सोहळा करू अशी ग्वाही विजयराव बावणे यांनी यावेळी दिली. यावेळी कोरपना तालुक्यातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेच्या सदस्या टिना गिरडकर यांनी तर संचालन विजय लोहबळे तर आभारप्रदर्शन संस्थेचे सदस्य नितीन बावणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here