लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि १७ डिसेंबर उरण तालुक्यातील श्री साई बाबांची मानाची पहिली पालखी श्री साई सेवा मंडळ(रजि.)उरण तालुका व देणगीदार, जनतेच्या वतीने काढण्यात आली असून गेली २२ वर्षे ही पदयात्रा निरंतर, श्रद्धामय, धार्मिक वातावरणाने शिस्तमय पद्धतीने आजही चालूच आहे. यंदा पदयात्रेचे हे २३ वे वर्ष आहे. यंदा श्री साई सेवा मंडळ उरण तालुका, देणगीदार, जनता यांच्या वतीने भव्य पालखी, वारकरी दिंडी पदयात्रा श्री दत्त मंदिर, देऊळवाडी(उरण शहर)येथून रविवार दि १७/१२/२०२३ रोजी सकाळी ७ वाजता श्री ची आरती करून श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान झाली आहे.पहाटे ५ वा. पूजन व भजन, पहाटे ५:१५ वा.ॐ श्री साईनाथाय नमः या मंत्राचा जप व पुढे मार्गस्थ, दुपारी १२ वा. माध्यान्ह आरती,१२:३० श्री साई सच्चरित्राचे सामूहिक पारायण व साईस्तवन मंजरी वाचन, ३:३० पुढील मुक्कामाकडे प्रस्थान, सायंकाळी ६:१५ धुपारती, रात्री ८:३० महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम आहे.तब्बल २६१ किलामीटरचा पायी प्रवास(पदयात्रा) करून पालखी दत्त जयंतीच्या एक दिवस अगोदर म्हणजेच सोमवार दि २५/१२/२०२३ रोजी सकाळी १० वा. श्री क्षेत्र पुण्यधाम शिर्डी येथे पोहोचनार आहे. पालखी दिंडीच्या सांगता प्रित्यर्थ श्री साई भंडारा व श्री सत्य नारायणाची महापूजा शनिवार दि ०६ जानेवारी २०२४ रोजी श्री रत्नेश्वरी मंदिर, जसखार, उरण येथे संपन्न होणार आहे. रविवार दि १७/१२/२०२३ रोजी सकाळी ७ वा श्री ची पालखी व पादुका साई भक्तांच्या दर्शनासाठी श्री दत्त मंदिर देऊळवाडी येथे ठेवण्यात आले होते. साई भक्तांनी या श्री च्या पालखी व पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला.श्री साई सेवा मंडळ उरण तालुका, देणगीदार, जनतेच्या वतीने पालखी उरण वरून शिर्डी कडे प्रस्थान झाली आहे.