,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन पुणे 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गेली १३ वर्ष झाली संत चक्रवर्ती ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र आळंदीत येथील अद्भुत अशा सिद्धबेटावर पं. कल्याणजी गायकवाड संगीत प्रतिष्ठानच्या वतीने भव्य प्रमाणात दीपोत्सव साजरा करण्यात येतो तसेच प्रतिष्ठानच्या वतीने तळागाळात कार्यरत असणा-या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींचा सन्मान या पवित्र भूमीत करण्यात येतो. संत ज्ञानोबारायांच्या ७२७ व्या समाधी सोहळ्यानिमित्त सोमवार दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी दीपोत्सव करण्यात आला. या कार्यक्रमात पं कल्याणजी गायकवाड, गायिका कार्तिकी गायकवाड, कौस्तुभ गायकवाड यांच्या शुभहस्ते पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले, पुणे यांना पं कल्याणजी गायकवाड सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मठाधिपती अमृतानंद जोशी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप राक्षे, सुनितामाई गायकवाड, भजन सम्राट आदिनाथ सटले, भजन सम्राट तुळशीराम आतकरे, ह.भ.प पांडुरंग महाराज कदम, ह.भ.प संजय महाराज कावळे, प्रल्हाद महाराज टकले, कैवल्य महाराज गायकवाड, प्रसिद्ध तबलावादक महादेवराव सगळे, माऊली महाराज, अमोल नवपुते, मृदंगमणी रघुराज ढोबळे, किशोर राक्षे, रोहीत बोरूडे, नितीन भागवत, मारूती तायनाथ, संतोषराव साळुंके, गौरव राक्षे, संतोष कदम हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संकेत संदीप राक्षे यांनी केले होते..
Home Breaking News *संत ज्ञानोबारायांच्या ७२७व्या समाधी सोहळ्यानिमित्त देवाची आळंदी येथे पं कल्याणजी गायकवाड संगीत...