by : Shankar Tadas
कोरपना :
संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीचे आयोजन तहसील कार्यालय कोरपना येथे करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नारायण हिवरकर संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष होते, प्रमुख उपस्थिती तहसीलदार श्री वटकर,बीडीओ श्री पेंदाम,श्री अरुण डोहे सदस्य,श्री अमोल आसेकर सदस्य,श्री निखिल भोंगळे सदस्य,श्री सुरेश टेकाम सदस्य,श्री नारायण राठोड सदस्य,नगरपंचायत सदस्य यांची आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत 162 प्रकणे ठेवण्यात ठेवण्यात आले बैठकीत साधक बाधक चर्चा करण्यात आली. त्यापैकी नऊ प्रकरणे कागदपत्राच्या पूर्ततेअभावी प्रलंबित ठेवण्यात आली व 153 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात पात्र लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे फार्म,श्रावण बाळ योजनेचे फार्म,इतर योजनेचे फार्म स्वतः भरुन कार्यालयात द्यावे. कोणतीही अडचण येत असेल तर संजय गांधी निराधार योजना समिती चे अध्यक्ष,सदस्य, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा. फार्म भरताना कोणतेही शुल्क लागत नाही, असे आवाहन संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी केले आहे. या बैठकीला मोलाचे सहकार्य ढोबळे बाबु,मालेकर मॅडम,सलिम भाई,कुळमिथे आदींनी केले.