मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या कडून दखल व सन्मानित…!

*लोकदर्शन ➗. प्रतिनिधी*
,*अनिल देशपांडे बार्शी*
*९४२३३३२२३३*
,
सोलापूर जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री इशाधीन शेळकंदे यांनी आषाढी वारी मध्ये उत्कृष्ट नियोजन करून १४ जून ते २८ जून दरम्यान पुणे ते पंढरपूर दरम्यान हरित वारी निर्मल वारी अंतर्गत चालणाऱ्या वारकऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून देत त्यांची वारी सुखकर केली,सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गावरील सर्व ग्रामपंचायती मध्ये स्वच्छ पाणी,घनकचरा व्यवस्थापन,वारी पूर्वीची व नंतरची स्वच्छता या बाबीवर श्री शेळकंदे यांनी विशेष लक्ष देऊन वारी मध्ये कुठेही अडचण येणार नाही याचे नियोजन केले होते…पालखी मार्गावर स्वच्छता हीच प्रथम सेवा या उक्तीप्रमाणे त्यांनी स्वच्छता ठेवण्यास प्रथम प्राधान्य दिल्या मुळे वारीत असणाऱ्या लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी दिसून आले…
श्री इशाधीन शेळकंदे यांच्या कामाची दखल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन त्यांना विशेष सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले,मुख्यमंत्री यांच्या कडून सलग दोनदा गौरविण्यात आलेले श्री शेळकंदे हे एकमेव अधिकारी आहेत,यावर प्रतिक्रिया देताना श्री शेळकंदे म्हणाले की हा माझा सन्मान नसून ज्याच्या मार्गदर्शनाखाली मी हे काम केले आहे ते माझे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी,पंचायतचे सर्व विस्तारअधिकारी,ग्रामसेवक व सरपंच यांच्या शिवाय मी हे काम करू शकलो नसतो,हा सन्मान खऱ्या अर्थाने त्यांचा आहे,मी फक्त त्याठिकाणी निमित्त आहे..!
विशेष सन्मान प्रमाणपत्र मिळाल्या बद्दल अनेकांनी श्री श्री शेळकंदे यांचे अभिनंदन केले…

अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *