,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा :👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पिठ नानिजधाम यांच्या प्रेरणेने ज. न. म. संस्थानच्या सामाजिक उपक्रमांतर्गत महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी २४ तास मोफत रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक 25 नोव्हेंबरला संत गजानन महाराज मंदिर, चिखली – जालना बायपास रोड, देऊळगाव राजा येथे संपन्न झाला.
या लोकार्पण सोहळ्यासाठी श्री अजय मालवीय ,उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री रितेश चौधरी सह. मोटर वाहन पोलीस निरीक्षक, श्री संतोष महल्ले पोलीस निरीक्षक देऊळगाव राजा, माजी आमदार श्री शशिकांत खेडेकर, श्री दिपक चिंचोले सा. बा. उप विभागीय अधिकारी, सुधीर राठोड वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा, पश्चिम विदर्भ पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पुजन करून फीत कापुन करण्यात आले.
सर्व प्रथम जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रतीचे पुजन व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपल्या प्रास्ताविकात पश्चिम विदर्भ पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे यांनी संस्थानचे वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. भक्ती हा मनाचा व्यायाम आहे ती नियमित करायला पाहिजे तरच मन प्रफुल्लित राहते. असे सांगितले.
यावेळी माजी आमदार श्री शशिकांत खेडेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री अजय मालवीय, श्री रितेश चौधरी अगदी मान्यवरांनी संस्थानाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश खडोळ यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष संतोष दसरे यांनी केले. यावेळी मंचकावर माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर, गजानन महाराज मंदिर अध्यक्ष परमेश्वर वाघमारे, जिल्हा निरिक्षक सौ. लताताई चिंचोले, जिल्हा अध्यक्ष संतोष दसरे, गणेश देशमुख, विजय काकडे, राजेश देशमाने, पत्रकार बंधू भगिनी व सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक आदि पदाधिकारी उपस्थित होते.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात,जसे की ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान, मरणोत्तर अवयव दान, रक्तदान शिबिर,मोफत रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्रातील विविध महामार्गावर ५२ रुग्णवाहिका २४ तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिर आयोजित केले जातात. राज्यात विविध महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांना प्राण गमवावा लागतो म्हणून त्यांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते जेणेकरून त्यांना जीवनदान मिळेल नेमका हाच धागा पकडून जगद्गुरुश्रींनी या सेवेचा प्रारंभ केला आहे. या सेवेला १३ वर्षे पूर्ण होत आहेत.आज पर्यंत या सेवेच्या माध्यमातून वीस हजाराच्या वर रुग्णांचे प्राण वाचले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देऊळगाव राजा येथील कार्यकर्ते, दक्षिण बुलढाणा जिल्हा सेवा समिती पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, तालुका सेवा समिती, सेवा केंद्र समिती, सर्व भक्त, शिष्य, साधक यांनी प्रचंड मेहनत घेतली.