,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉 (प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
देऊळगाव राजा शहराला खडकपूर्णा धरणातून पाणी पुरवठा केला जातो, मात्र यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने सद्यस्थितीत जलाशयात केवळ 12 टक्के पाणी साठा शिल्लक आहे,
भविष्यात शहरवासीयांना पाणीटंचाई चा सामना करावा लागणार आहे, त्यासाठी नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करून नगर परिषद प्रशासन ला सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषद चे कर्तव्यदक्ष प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले आहे,
यावर्षी देऊळगाव राजा परिसरात अतिशय कमी पाऊस पडला आहे, त्यामुळे अनेक जलाशयात पाणीसाठा अत्यल्प आहे, आता पावसाळा संपल्याने पाऊस पडण्याची शक्यता नाही,
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकपूर्णा धरणात केवळ 12 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने यावर्षी शहरात तीव्र पाणीटंचाई चा सामना करावा लागणार आहे, तेव्हा शहरवासीयांनी पाण्याचा वापर जपून करावा, पाणी विनाकारण वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन नगर परिषद ने केले आहे, शहरवासीयांना पाणी पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असुन प्रशासन च्या वतीने सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत अशी माहिती मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी दिली आहे,