—————————————-
लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 व सायबर सेक्युरिटी या विषयावर कोरपना येथील स्टेला मॅरीस कॉन्व्हेंट तथा ज्युनिअर कॉलेज मध्ये कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच तथा बेटी बचाओ बेटी ..पढाओ या विषयाबाबत सखोल माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण ,मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर व तालुका विधी सेवा समिती कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कायदेविषयक शिबिरात बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथील शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी होत आहे. आपल्या देशात स्त्रीभ्रूणहत्या वाढत चाललेली आहे त्यामुळे केंद्र सरकारने बेटी बचाव बेटी पढाव ही योजना सुरू केली आहे. मुलींना समाजात समान वागणूक मिळावी व मुलींचे संरक्षण व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला मा. आर .आर थोरात अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश प्र. श्रेणी, क -स्तर कोरपना, मा. श्री. ए. जे.पाटील सह. दिवाणी न्यायाधीश कोरपना, ॲड.पवन मोहितकर उपाध्यक्ष तालुका बार असोसिएशन कोरपना , मा. सचिन कुमार मालवी गटशिक्षणाधिकारी कोरपना तसेच स्टेला मॅरीस कॉन्व्हेंट व ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या ,शिक्षक ,विद्यार्थी आदी उपस्थित होते.