अखेर प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांचे उपोषण मागे ♦️राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची मधस्थी ; परसोडा येथे अन्न त्याग आंदोलन

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

कोरपना – आरसीसीपीएल परसोडा लाईमस्टोन माईस साठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत कंपनी कडून करण्यात येणाऱ्या मनमानी धोरणा विरुद्ध परसोडा येथील प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांनी मागील अठरा दिवसापासून उपोषण सुरू केले होते. हे उपोषण राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या मध्यस्थी नंतर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मागे घेतले.
कंपनी संदर्भात बारा मागण्या उपस्थित करून सदर उपोषण सुरू होते.यातच काटकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावली जात होती. त्यांच्या प्रकृतीची काळजी लक्षात घेता
तुर्ततास मायनिग बंद करून लवकरच सामोपचाराने कंपनी व प्रकल्पग्रस्त यांची समन्वय बैठक लावून न्याय मागण्या सोडवण्यात येईल. या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार अड संजय धोटे , माजी आमदार सुदर्शन निमकर , तहसीलदार पी एस व्हटकर , पोलीस निरीक्षक संदीप एकाडे
खुशाल बोंडे , किशोर बावणे , भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, शिवाजी सेलोकर , राजू घरोटे ,
अमोल आसेकर,दिनेश खडसे आदी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *