by : Shankar Tadas
वरोरा : सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून पारिवारिक सदस्यांसह वंचित, दुर्लक्षित, दिव्यांग समाज बांधवांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलवण्यासाठी आनंदवन मित्र मंडळाचे सचिव, समाजसेवक व पत्रकार राजेंद्र मर्दाने यांचा वाढदिवस आनंदवनातील सभागृहात स्नेह मीलन कार्यक्रमांतर्गत स्तुत्य उपक्रमांच्या आयोजनांनी सोत्साह संपन्न झाला.
स्वरानंदनवन सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वरानंदवनाचे व्यवस्थापक सदाशिवराव ताजने, प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश राठोड, नेत्रतज्ज्ञ डॉ. अमोल कातकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा. बळवंतराव शेलवटकर, प्रवीण सुराणा, प्रवीण खिरटकर, सनी गुप्ता, आनंदम् मैत्री संघाचे भास्कर गोल्हर, संगीता गोल्हर, प्रशांत देशमुख, आनंदवन मित्र मंडळाचे डॉ. प्रवीण मुधोळकर, प्रवीण गंधारे, राहुल देवडे, शाहीद अख्तर, अशोक बावणे, विवेक बर्वे, खेमचंद नेरकर, आनंदवनाचे कार्यकर्ते दीपक शीव, राजेश ताजने , शौकत खान प्रभृती प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. मुधोळकर म्हणाले की, राजेंद्र मर्दाने यांचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून त्या व्यतिरिक्त समाजसेवा, सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक व अन्य क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान आहे. आनंदवन मित्र मंडळाद्वारे शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच विविध समाजातील वंचित घटकांसाठी काम सुरू असून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या निवारणासाठी नवनवीन उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात.
यावेळी राजेश ताजने, दीपक शीव यांनी राजेंद्र मर्दाने यांच्या पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तसेच संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांबद्दल गौरवोद्गार काढले.
स्वागताला उत्तर देताना राजेंद्र मर्दाने म्हणाले की, सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून वंचित समाजबांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचे काम आनंदवन मित्र मंडळ करीत आहे. माझा वाढदिवस बहुचर्चित दिव्यांग कलाकारांसोबत साजरा करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात सदाशिवराव ताजने म्हणाले की, चांगल्या उपक्रमातून चांगले संदेश देण्याचे काम राजेंद्र मर्दाने सातत्याने करीत असतात. त्यात मंडळाचे सदस्य डॉ. मुधोळकर, राहुल देवडे, बळवंतराव शेलवटकर व त्यांचे जिवलग मित्र उत्तम सहकार्य करून सर्वांना आनंदात सहभागी करतात. मर्दाने यांनी अनावश्यक बाबींना फाटा देत आनंदवनात वाढदिवस साजरा करून संस्मरणीय ठरविला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
प्रेरणादायी गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वरानंदवनातील दिव्यांग कलाकारांनी विविध लोकप्रिय गीत व युगल डान्स सादर करीत मर्दाने यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी केक कापून राजेंद्र मर्दाने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्वरानंदवनातील सर्व कलाकार व उपस्थितांनी वाढदिवस स्नेहमिलन अंतर्गत फराळाचा आस्वाद घेतला. तदनंतर वाढदिवसानिमित्त महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी घरी बोलावून मर्दाने यांना शुभेच्छांसह शुभाशीर्वाद दिले.
संचालन स्वरानंदवनाचे कलाकार अरुण कदम यांनी केले.
कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात कार्यरत किशोर देवडे, भरत पातालबंसी, सखाराम पाऊलकर, योगेश खिरटकर, मयूर दसुडे, विजय वैद्य, ठाकुरदास मर्दाने, लखन केशवाणी, अविनाश कुळसंगे, अनिता पुप्पलवार, बेबीताई कंडे, सुमित्रा मर्दाने, स्नेहा देशमुख, कांचन देवडे, साबिया खान, सोनू कंडे, पार्वती मर्दाने, इंदूताई दडमल, तुषार मर्दाने इत्यादी आवर्जून उपस्थित होते.