by : Shankar Tadas
गडचांदूर :
कोरपना तालुक्यातील कढोली खुर्द येथे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्या वर्षी राजेंद्र पिंपळशेंडे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. 9 ऑक्टोबरला आयोजित ग्रामसभेत समितीचे पुनर्गठण करण्यात आले. यावर्षी प्रथमच बोरी नवेगाव आणि आसन खुर्द येथील एका सदस्याची निवड उपाध्यक्षपदी करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार समितीचे उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश पेंदोर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समितीच्या इतर सदस्यामध्ये सरपंचा निर्मला मरसस्कोल्हे, उपसरपंच विनायक डोहे, व्यापारी प्रतिनिधी मोरेश्वर भोंगळे, तलाठी विशाल कोसनकर, सचिव विलास चव्हाण, पोलीस पाटील सविता लांडे, मंगेश हिवरे, दत्ता उपरे, कविता देशमुख, ज्योती पंधरे, शामसुंदर वाघमारे, प्रमोद पायघन, दिवाकर आस्वले, हरिदास पिंपळकर, बंडू टोंगे, संदीप धोटे, रामदास कुरसंगे, प्रफुल सिडाम यांचा समावेश आहे. मागील वर्षी समितीचे कार्य समाधानकारक असल्याची भावना व्यक्त करीत श्री संजय लोहे यांनी याही वर्षी राजेंद्र पिंपळशेंडे यांनाच अध्यक्ष कायम ठेवावे, अशी सूचना केली तेव्हा सर्वानी सहमती दर्शविली. कोणत्याही वादाशिवाय पार पडलेल्या या निवडीमुळे कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या समजूतदारपणाचे दर्शन झाले.
मोठ्या संख्येने महिला व पुरुष मंडळी उपस्थित असलेल्या या ग्रामसभेत इतर प्रश्न मात्र चांगलेच गाजले. पदाधिकाऱ्यांनी सर्व प्रश्न ऐकून त्यांचा निपटारा करण्याची ग्वाही दिली. यावेळी तंमुस अध्यक्ष आणि इतर सदस्य यांना गुलाल लावून तरुण मंडळी आणि गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.