*”उद्योग ऊर्जा “संस्थेचा व्यावसायिक मेळावा उत्साहात संपन्न. .!*

.!*

लोकदर्शन नेरळ (प्रतिनिधी-गु👉रुनाथ तिरपणकर)

शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी , नेरळ येथे उद्योग ऊर्जा या व्यावसायिक बिझनेस नेटवर्किंग क्लबच्या माध्यमातून, उद्योजक व्यावसायिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता .
नेरळ येथील श्रीजी मॉल या नवीनच निर्माण झालेल्या वास्तूमध्ये आयोजित केलेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमास शंभरहून जास्त उद्योजक व्यावसायिक उपस्थित होते . उद्योग ऊर्जा ही संस्था मागील अनेक वर्षापासून लोकांमध्ये व्यावसायिक उद्योजक गुण वाढावे यासाठी अनेक उपक्रम राबवते . एकमेकांच्या सोबतीने, एकमेकांना प्रोत्साहन देत , व्यवसाय वाढवू व सर्वच श्रीमंत होऊ हा जीवनमंत्र उद्योजकांना शिकवत तब्बल 103 मिळावे संस्थेद्वारे आत्तापर्यंत आयोजित केले गेले आहेत . शनिवारच्या मेळाव्यात संस्थेचे संस्थापक श्री निलेश बागवे , सल्लागार सचिन चोगले , ध्रुव अकॅडमीचे संस्थापक संचालक महेश सावंत , उद्योजक भावेश चंद्रा , गुलाब शहा , पत्रकार गुरुनाथ तिरपण कर यांसारखे अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने होतकरू उद्योजक उपस्थित होते .
संस्थेचे ज्येष्ठ सदस्य व सोहम क्रिएशन या कंपनीचे संस्थापक संचालक प्रमोद डिंगणकर यांनी उपस्थितांना यावेळी आपल्या व्यावसायिक जीवनाची रोमांचक यशोगाथा सांगितले . अनेक अडचणींवर मात करत , येणाऱ्या प्रत्येक संकटाला धीराने तोंड देत, स्वतःवर विश्वास ठेवून , प्रामाणिकपणे व्यवसाय केला तर यश खेचून आणता येते हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून लोकांना दाखवून दिले .उद्योजक भावेश चंद्रा यांनी नेरळ परिसरात ज्या काही मोठ्या उद्योजक संधी उपलब्ध होत आहेत , विशेषतः नवीनच निर्माण झालेल्या श्रीजी मॉल येथे स्थावर मालमत्तेत गुंतवणूक कशी उपयुक्त आहे व विशेषतः तिसरी मुंबई म्हणून उदयास येत असणाऱ्या नेरळ कर्जत परिसराचे व्यावसायिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले .कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ध्रुव अकॅडमीचे संचालक महेश सावंत यांनी व्यावसायिक नेतृत्वाचे दहा महत्त्वाचे गुण उपस्थित उद्योजक व्यवसायिकांना समजावून सांगितले . व्यवसायात उतरायचंच असेल तर मोठी स्वप्न बघायला घाबरू नका , आत्मविश्वासाने, निष्ठेने काम केल्यास नवीन नवीन संकल्पना सुचत राहतील . आणि या नवनवीन संकल्पनांची अंमलबजावणीच तुम्हाला भविष्यात व्यावसायिक नेतृत्व मिळवून देतील हा मोलाचा सल्ला याने उपस्थित त्यांना दिला.
संस्थेची ज्येष्ठ सदस्य सचिन चोगले यांनी संस्थेद्वारे चालल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली .संस्थेचे संस्थापक श्री निलेश बागवे यांनी याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला . व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर अशा व्यावसायिक मीटिंगमध्ये उपस्थित रहा , इतरांशी जोडले जा , एकमेकांच्या सहकार्याने सोबतीने स्वतःचाही विकास करा आणि इतरांनाही मदत करा असे आवाहन श्री बागवे यांनी केले . प्रसिद्ध निवेदिका कुशल कनिका यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .उत्तम संयोजन , व्यावसायिक ओळखी , व्यवसायाची देवाण-घेवाण , उपयुक्त मार्गदर्शन , आणि एकत्रित व्यावसायिक करण्याच्या संधी प्राप्त झाल्यामुळे, अशा प्रकारचा उपक्रम राबवल्याबद्दल सर्वच उद्योजक व्यावसायिक यांनी संयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *