लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे
उरण दि ८ ऑक्टोबर
ओबीसींच्या विविध मागण्या मान्य करण्याकरिता काँग्रेस ओबीसी कोकण विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
१) संपूर्ण देशात ओबीसींची जातनिहाय जणगणना करणे
२) लोकसभा,राज्यसभा,विधानसभा व विधान परिषदेत महिलांना ३३% आरक्षणाचा ठराव संमत झाला असून त्यापैकी १५ % आरक्षण हे ओबीसी महिलांकरीता राखीव करण्यात यावे.
३) नाॅन क्रिमिलियरची अट संपूर्णपणे रद्द करण्यात यावी.
४) महाराष्ट्र शासनाने लागू केलेला कंत्राटी कामगार भरतीचा निर्णय रद्द करावा.
५) महाराष्ट्र शासनाने सरकारी शाळांचे खाजगीकरण करण्याचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा.वरील मागण्यांचा योग्य तो निर्णय घेऊन ओबीसी प्रवर्गास न्याय द्यावा ही अशी निवेदनातन मागणी करण्यात आली.यावेळी ठाणे येथे ठाणे तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी ( महसूल ) मॅडम यांना पत्र देताना कोकण विभागीय अध्यक्ष शंभो म्हात्रे,प्रदेश पदाधिकारी भोळाशेठ पाटील,शैलेश राऊत,सुरेश खेडे पाटील,डाॅ.विनोद पाटील,ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे,ठाणे ग्रामिणचे तुषार देसले,भिवंडीचे अनंता पाटील,कल्याणचे जयदिप सानप,नवी मुंबईचे संतोष सुतार,अनिल भगत,धनाजीशेठ गोंधळी,संजय शिंदे,सुधीर जाबरे,राजा जाधव ई.उपस्थित होते.अलिबाग येथे रायगड जिल्हा अधिकारी यांना पत्र देताना रायगड जिल्हा अध्यक्ष उमेश भोईर ,श्रुती ताई म्हात्रे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा अधिकारी देवेंद्र सिंह यांना पत्र देताना रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष महादेव चौहान,तुळशीराम पवार,विश्वनाथ किल्लेदार तायडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.सिंधुदुर्ग येथे सिंधुदुर्ग उपजिल्हाधिकारी यांना पत्र देताना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष महेश अंधारी,अमिदी मेस्त्री व इतर पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती कोकण विभागीय अध्यक्ष शंभु म्हात्रे यांनी दिली.