- ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पुसेवाडी या गावात पूर्वनियोजित दंगलीचा कट रचून नुरुल हसन यांची हत्या करण्यात आली ,हत्येच्या आरोपींना कठोर कारवाई व्हावी, नुरुल हसन कुटुंबात एक मिळकत करणारा व्यक्ती होता घडलेल्या दंगली मुळे त्यांचा जीव जाऊन त्यांच्या परिवाराला उघड्यावर पडण्याची पाळी आली व त्यांच्यावर संकटाचा डोंगर कोसळला ,त्यांच्या कुटुंब परिवाराला 50 लाख रुपये आर्थिक मदत व एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी तसेच पुणे येथे मोसिन शेख यांचा देखील कट रचून हत्या घडवली राज्यात नियोजित कट रचून मुस्लिम युवकांना टार्गेट करून ज्या पद्धतीने हत्या सत्र सुरू आहे कधी रेल्वेमध्ये तर कधी दंगलीमध्ये अशा घटना वाढ होत असताना या राज्यातील अल्पसंख्यांक समुदाय, महिला युवक यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे मुस्लिम समाजामध्ये दहशतीचे वातावरण काही मासे फिरू समाज संघटना करण्याचा कट रचीत आहे, पुरोगामी महाराष्ट्रात समाज समाजातील द्वेष निर्माण करणाऱ्या घटनेचा निषेध करण्यात येत असून महाराष्ट्र मध्ये मुस्लिम अल्पसंख्यांक ख्रिश्चन धर्म असुरक्षित जीवन जगत आहे ,अनेक क्षेत्रात हा सामाजिक आर्थिक शैक्षणिक व दारिद्र्याचे जीवन जगत असताना अनेक क्षेत्रात पिछाडीवर जात आहे जातीय तणाव व हत्या सारख्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात अशोभनीय असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी पुरोगामी राज्याची सार्वभौम प्रतिमा कायम ठेवीत उजाळा देण्यासाठी व धर्मनिरपेक्ष शासनाचा पुढाकार घेत महाराष्ट्र राज्यामध्ये ॲट्रॉसिटी कायद्याच्या धरतीवर मुस्लिम समाजाच्या संरक्षण कायदा तयार करण्यात यावा या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना शिष्टमंडळाने भेटून मुख्यमंत्री एकनाथरा शिंदे यांचे नावे निवेदन देण्यात आले ,यावेळी सय्यद आबीद अली ,शेख रसूलअब्दुल रहमान जब्बार शेख अब्दुल हमीद दाऊद भाई मेमन नादीर कादरीयुनूस पठाण यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांनी धरणे देऊन निवेदन सादर केले