,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
देऊळगाव राजा नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक राजेंद्र गोरे व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी टी एच वाटाणे हे नियत वयोमानानुसार न प च्या सेवेतून दिनांक 30 सप्टेंबर 23 रोजी सेवा निवृत्त झाले त्यांना निरोप देण्यासाठी न प चे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी निरोप समारंभ कार्यक्रम चे आयोजन केले होते, या कार्यक्रमास शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी वर्ग, पत्रकार मंडळी यांनी उपस्थित राहून दोन्ही कर्मचाऱ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या तर न प च्यावतीने सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांना देय असलेल्या रकमेतून तुर्त एक- एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
देऊळगाव राजा नगरपरिषद चे कार्यालय अधिक्षक राजेंद्र गोरे व पाणीपुरवठा विभागातील वाल्मन तिलक वाटाणे हे नियत वयोमानानुसार नप च्या सेवेतून दिनांक 30 सप्टेंबर 23 रोजी निवृत्त झाले त्यांना निरोप देण्यासाठी मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी न प च्या सभागृहात निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 1 ऑक्टोबर २३ रोजी केले होते यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष शांतीलाल सिंगलकर, संतोष खांडेभराड ,कवीश जिंतूरकर, डॉक्टर सौ. अरुणा अशोक काबरा, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे ,मुख्याधिकारी अरुण मोकळ उपस्थित होते सेवानिवृत्त दोघांनी न प ला दिलेल्या सेवेबद्दल मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांनी ज्या प्रकारे शहरवासीयांची सेवा केली त्याचप्रमाणे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सध्या नप तील इतर कर्मचाऱ्यांनी शहरवासींची सेवा करून न प चे नाव उज्वल होईल असे काम करून दाखविण्याचे आवाहन केले तर सत्कारला उत्तर देताना राजेंद्र गोरे यांनी सांगितले की माझ्या 38 वर्षाच्या सेवेत मला प्रत्येक वेळी नप तील पदाधिकारी मुख्याधिकारी प्रशासक नपचे कर्मचारी शहरातील जनता यांनी सहकार्य केले त्यांच्या सहकार्यामुळेच मी माझी 38 वर्षाची सेवा यशस्वीपणे पार पाडू शकलो असे सांगितले ,कार्यक्रमच्या यशस्वी साठी नप च्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले,