लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा सास्ती येथे पाणी प्रश्न पेटला असून अनेक दिवसांपासून गावात दोन दोन, तीन तीन दिवस पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर उन्हाळ्यात येथे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अभिजीत धोटेंच्या नेतृत्वात सास्ती येथील ग्रामस्थांनी राजुरा पंचायत समितीवर धडक देऊन गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, पाणी पुरवठा अभियंता व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ही समस्या सोडविण्याची मागणी केली. यावर अधिकाऱ्यांनी गावात तातडीने दोन ट्युबवेल देण्याचे मान्य केले तर लवकरात लवकर येथे कायम स्वरूपी मुबलक पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
या प्रसंगी बाळुभाऊ नळे, बाळुभाऊ रोगे, गणपत काळे, मिथलेश रामटेके, मधुकर झाडे, पंकज कुडे, रमेश कुंदलवार, संतोष गोनेलवार, दिवाकर कोयाडवार, सतीश राजूरकर, संतोष चोखारे, नितिन पहानपटे, महेश लांडे, अक्षय शेरकी, आनंद मांडवकर, संदिप लोहबडे, अरुण लोहबडे, राजुभाऊ कुडमेथे, बापूजी ईटनकर, बबन लोहे, प्रविण नरड, प्रविण खनके, निलकंठ शेंडे, नंदकिशोर चन्ने, आकाश माऊलीकर, रोहित नळे, सचिन नळे, नदीम शेख, याशिल नळे, विकास पेटकर, तुषार रोगे आदींची उपस्थिती होती.