,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर: भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांचे स्थान नेहमीच मानाचे राहिले आहे. ते परिवाराचा आधारवड असून त्यांच्याच छत्रछायेत प्रत्येक जण लहानाचे मोठे झाले आहे. त्यामुळे त्यांना सन्मानाची-आदराची वागणूक देणे खर्या अर्थाने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आजी-आजोबांविषयी आपुलकीची भावना चिमुकल्यांमध्ये रुजावी या हेतूने एकलव्य इंग्लिश स्कूल, नांदाफाटा येथे जागतिक जेष्ठ नागरिक दिन व स्वच्छता हीच सेवा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी जेष्ठ नागरिकांसाठी संगीत खुर्ची, बॉल पासिंग, नृत्य, गायन, भजन अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. अनेक जेष्ठ नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला व आपले मनोगत व्यक्त केले. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आज समाजाला शिक्षणासोबतच संस्काराची गरज असल्याने मत कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे सचिव प्रा. आशिष देरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ नागरिक ह.भ.प. रामचंद्र गोहकार महाराज उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी कोल्हे, उत्तम चोपने, शाळेच्या प्रशासक स्वाती देरकर, मुख्याध्यापक नितेश शेंडे, अखिल अतकारे, विठ्ठल टोंगे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तथा पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल टोंगे तर संचालन शिक्षिका कल्याणी मडावी व आभार प्रदर्शन रेवती लांडे यांनी केले.