लोकदर्शन देऊळगाव राजा:👉प्रा अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
केंद्र व राज्य सरकारचे वतीने दिनांक 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक गावात स्वच्छता विषयक पंधरवाडा साजरा करून स्वच्छते विषयी कार्यक्रम राबवून एक दिवस एक तारीख एक तास म्हणून प्रत्येक नागरिकांनी आपापले परिसर स्वच्छ करणेबाबत आदेशित करण्यात आले होते त्या अनुषंगाने शहरात नगरपरिषद प्रशासनाचे वतीने दिनांक एक 1ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत भरगच्च कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी शिवाजी हायस्कूल मधून स्वच्छतेविषयी प्रभात फेरी काढून बस स्थान चौकातून स्वच्छतेस प्रारंभ केला यावेळी प्रभात फेरीला उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांनी हिरवी दिंडी दाखवली तर बस स्थानक चौकात उपस्थिताना मार्गदर्शन करताना नपचे मुख्याधिकारी अरूण मोकळ यांनी सांगितले की स्वच्छता हीच सेवा समजून प्रत्येक नागरिकाने आपले वैयक्तिक जबाबदारी समजून आपापला परिसर स्वच्छ ठेवल्यास भविष्यात भारत देश आर्थिक महासत्तेसोबतच सर्वांगीण विकासाचे दृष्टीने वाटचाल करेल असे प्रतिपादन केले ,
याबाबत सविस्तर वृत्त असे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात दिनांक 1 ऑक्टोबर 23 ते 15 ऑक्टोबर 23 या कालावधीत स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले यामध्ये स्वच्छते विषयी अधिक जनजागृती करून अस्वच्छतेचे काय दुष्परिणाम होतात याबाबत नागरिकांना जागृत करणे त्यांना त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करणे आपले घर व आपला परिसर प्रत्येक नागरिकांनी स्वच्छ ठेवल्यास स्वच्छता हीच सेवा ठरेल देऊळगाव राजा नप चे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी या स्वच्छता पंधरवड्यात शहरवासी यांच्या सहभागाने भरपूर कार्यक्रमाचे नियोजन केले आहे एक ऑक्टोबर रोजी एक तारीख एक दिवस एक तास स्वच्छतेसाठी असा संदेश देऊन संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे कामास सुरुवात केली सकाळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन स्वच्छता प्रभात फेरी काढण्यात आली बस स्थानक चौकात साफसफाई करण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी बसवलेले पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले तर एका चार वर्षीय चिमुकलिने स्वच्छता व पर्यावरण संतुलन बाबत कविता सादर केली त्यानंतर श्री शिवाजी महाराज चौक संतोष चित्रमंदिर चौक आठवडी बाजार संपूर्ण परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर गीतांजली टॉकीज चौक परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील नागरिक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड माजी नगरध्यक्ष तुकाराम खांडेभराड संतोष खांडेभराड कवीश जिंतूरकर रमेश दादा कायंदे ॲड मिनासे डॉक्टर गणेश मांटे गोपाळ व्यास राजेश भुतडा विजय देवउपाध्ये बाळू शिंगणे हनिफ शहा नपाचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ त्यांचें अधीनस्त सर्व कर्मचारी शाळेचे शिक्षक वृंद, हरित सेनेचे विध्यार्थी, एनसीसी चे विद्यार्थी श्री व्यंकटेश महाविद्यालय चे विध्यार्थी, समर्थ कृषि महाविद्यालय चे विध्यार्थी उपस्थित होते.
,,