लोकदर्शन मौदा 👉 प्रदीप पुरी
मौदा दिनांक २७सप्टेंबर कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजार येथे हिरवी मिरचीचे काटापूजन शुभारंभ दि. १२/०९/२०२३ रोज मंगळवार ला करण्यात आला हिरवी मिरची मुहूर्तावर बोली लिलाव पद्धतीने काढून मिरचीला भाव 21 ते 24 रुपये मौदा येथे शेतकऱ्यांची मिरची खरेदी करण्यात आली .
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री राजेशजी ठवकर यांच्या हस्ते काटा पूजन शुभारंभ करण्यात आले त्याप्रसंगी समितीचे उपसभापती श्री राम नरेश जी सेनवार सर्वश्री सदस्य गण श्री ज्ञानेश्वर जी वानखेडे,राजेंद्र लांडे ,दादाराव सारवे,दिगांबर बांगडकर,सावन कुमार येळणे,सुनील दारोडे,चंद्रभान किरपान,नंदलाल पाटील,अनिल कोंगे,मंगेश तलमले,प्रमोद बरबटे,रोशन मेश्राम,पृथ्वीराज गुजर,मोरेश्वर सोरते,साै कल्पनाताई चरडे,श्रीमती मंदाताई तुमसरे यांच्या हस्ते उपस्थित सर्व शेतकरी बंधूंचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .त्यावेळी समितीचे प्रसचिव प्रदीप पुरी,सचिन दातीर ,ओम प्रकाश गजभिये ,विजय उपासे पुरुषोत्तम कडू विद्यानंद डोंगरे धर्मराज निमजे अभिनव गजभिये व भाजीपाला आडतीया व्यापारी मुजफ्फर बेग,ओमप्रकाश सोनवणे,अंकुश मेहर लव मेहर चुडामण ठाकरे अनिल मेहर अल्ताफ बेग,चिंटू कुंभलकर,धीरज चरडे,पांडुरंग लांजेवार इत्यादी अडतिया व व्यापारी व मोठ्या संख्येने शेतकरी बंधू उपस्थित होते.
तसेच समितीमध्ये सोयाबीन हिरवी मिरची गहू चना धान याशिवाय कापूस तूर इत्यादी धान्य मालाची खरेदी विक्री सुरू आहे .शेतकऱ्यांनी योग्य भाव वजन माप व नगदी चुकाऱ्याच्या हमीकरिता आपला शेतमाल समिती आवारातच विक्री करीता आणावे तसेच अडत्या व्यापारी बांधवांना हिरवी मिरचीचे अवैध काटे व खेड्यात जाऊन अवैध खरेदी करू नये असे आव्हान समितीचे सभापती श्री राजेशजी ठवकर व समितीचे प्रसचिव प्रदीप पुरी यांनी केले आहे .