लोकदर्शन ÷ मोहन भारती
चंद्रपूर :– चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांना दिनांक १ सप्टेंबर पासूनच बरे वाटत नव्हते. तेव्हाच जनसंवाद यात्रा सुरू झाली. जन संवाद यात्रेत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत यात्रेत ५ तारखे पर्यंत सक्रिय सहभाग नोंदविला. मात्र आधीच खराब असलेली तब्येत नंतर पूर्णपने खराब झाली, त्यांना नागपुरात हलविण्यात आले, वैद्यकीय तपासणीत गंभीर वायरल फिव्हर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ब्लड रिपोर्ट नॉर्मल होते. जवळ पास ६-७ दिवसात पूर्णपने बरे झाले होते. की १२ सप्टेबर ला तब्येत अचानक खूप खराब झाली. त्याच दिवशी ब्लड-टेस्ट करून कळले की डेंग्यू ची लागण झाली आहे व डॉक्टरांनी शारीरिक स्थिती पाहता तातडीने अॅडमिट करायला लावले, ३ दिवस उलटून गेले तब्येत अजुन जास्त खालावली नंतर नागपुरातील नामवंत रुग्णालयात ICU मध्ये देखरेखित ठेवण्यात आले होते. आता अजुन काही दिवस त्यांना भरती ठेवण्यात येणार आहे.
आता आपली तब्येत ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील काही दिवस उपचार सुरू राहणार आहे. वातावरण असे आहे की वायरल पाठोपाठ डेंग्यू ची लागण झाली आहे. तेव्हा सर्वांनी आपल्या तब्येतीला जपावे तसेच समोर केरळ मध्ये *निफा व्हायरस* येतो आहे तरी सर्व जनतेने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी केले आहे.