लोकदर्शन नागपुर 👉 स्नेहा उत्तम मडावी
डॉ. रेखाताई जगनाळे मोतेवार यांची निवड झाल्यावर संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी डॉ. रेखाताईची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी माहीती दिली
डॉक्टर रेखा जगनाळे मोतेवार
मराठी साहित्य मंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली त्याकरिता माझी प्रतिक्रिया निश्चितच आनंददायी आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली याचा मला अतिशय आनंद आहे कारण हा माझा सन्मान म्हणजे माझ्या साहित्य लेखन कार्याचा सन्मान आहे. मला असं वाटतं की, जे मी वीस वर्षापासून लेखन केलं त्याचं आज सार्थक झाल्याचा मला सार्थ अभिमान आहेआणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मी या मराठी साहित्य संमेलन परंपरेतील एक वारकरी ठरली मला या परंपरेतील एक घटक होता आलं. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. मला या क्षणी माझ्या सर्वच गुरुवर्यांची आठवण होते आहे. त्यांच्या साहित्य संस्कारामुळे मला हे यशशिखर गाठता आलं. एकेकाळी मी ज्यांच्या साहित्याने भारावून गेले. ते माझे गुरुवर्यआदरणीय डॉ. मदन कुलकर्णी, डॉ अक्षय कुमार काळे, कवी ग्रेस, डॉ. आशाताई सादेकर, डॉ यशवंत मनोहर या सर्वांचे व अन्य गुरुवर्यांचे माझ्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झालेले साहित्यिक संस्कार मला वेळोवेळी मार्गदर्शन देत राहिले. यांच्या प्रति मी येथे कृतज्ञता व्यक्त करते. पुढील काळात मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदाचा मी मान राखून मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करीत राहील. कारण अलीकडे मराठी भाषा लोप पावत असल्याची सर्वत्र ओरड होत आहे. आणि हो मराठी माणसाला याची भीती वाटत आहे. कारण भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळींचे भान ठेवून मी मराठी भाषेचे म्हणजेच बोली भाषेबरोबर प्रमाण भाषेचे संवर्धन करीत राहील. त्याकरिता विविध उपक्रम राबवून हे करता येणं शक्य आहे. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी माझ्या परीने होईल तसे प्रयत्न मी करीत राहील. हे विचार समाजमनात बिंबवेल आणि या अध्यक्षपदाचा मान ठेवील.त्यांचे काम पाहून बीन विरोध निवड करण्यात आली सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या
डॉ. रेखाताई जगनाळे मोतेवार यांना पुढच्या वाटचलीस हार्दिक शुभेच्छा