,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लखमापुर उपकेंद्र येथे प्रा.आ.केंद्र कवठाळा व अंबुजा सिमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30 वर्षाच्या वरील नागरिकांची बिपी व शुगर आणि महीलांची स्तनाशय तपासणी व गर्भाशयमुखाची तपासणी व आभा कार्ड या बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सरपंच श्री .अरुण भाऊ जुमनाके ,सौ आशाताई काकडे (ग्राम पंचायत सदस्य) तालुका वैद्यकीय अधिकारी. .डॉ. स्वप्नील टेंबे , डॉ. बल्की . श्री.जितेंद्र बैस (आरोग्य समन्वयक अंबुजा सिमेंट फाउंडेषन) व डॉ येवले मैडम(सा.आ.अ)आरोग्यवर्धिनी उपकेंद्र लखमापुर व गावातील तंटा मुक्त अध्यक्ष व पोलीस पाटील तसेच गावातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन आशा वर्कर नेहा ताई जगताप यांनी केले,प्रस्तावना सौ मिनाक्षी ताई कटाइत यांनी केली.श्री अशोक गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले…डॉ येवले मैडम(सा.आ.अ)यांनी नागरिकांची तपासणी केली,महिला कर्करोग तपासणी प्रिती ताई कातरकर (ANM)यांनी केली संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारा विषयी जनजागृती करण्यात आली. श्री.मडावी (MPW) यांनी PMY,JSY,ABHA health कार्ड व आदिवासी मातेला मिळणारा मातृव वंदन योजने बदल माहीती देण्यात आली.याप्रसंगी – आशा गटप्रर्वतक.सौ सविता जेनेकर.सौ.मिनाक्षी ताई कटाइत अंगणवाडी सेविका व सौ.पोयाम ताई (आशा) सौ.जगताप ताई (आशा)सौ.सविता सोयाम(आशा) सौ.सुनिता चाहरे(आशा) आदी उपस्थित होत्या
या शिबिरात 105 नागरिकांची तपासणी करण्यात आली,