by : Rajendra Mardane
चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा शहरात सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.
स्वातंत्र्याची लढाई काँग्रेस कार्यकर्ते लढले आहे,आता भारत मातेला वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्याला लढावं लागेल. देशातील लोकशाही वाचविण्यासाठीची ही लढाई आहे, आणि काँग्रेस कार्यकर्त्याची जास्त जबाबदारी आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांनी याप्रसंगी केले.
आनंदवन चौकातून सकाळी सहा वाजता ही पदयात्रा निघाली. पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा निरीक्षक मुजीब पठाण, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर,जनसंवाद यात्रेचे नागपूर विभाग समन्वयक नाना गावंडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, माजी महापौर संगीता अमृतकर, कामगार नेते केके सिंग, विनोदजी अहिरकर, तानाजी सावंत, संजय महाकाळकर, माजी सभापती दिनेश चोखारे, पत्रकार बाळ कुळकर्णी, चंद्रपूर शहर महीला अध्यक्षा चंदाताई वैरागडे,प्रशांत भारती आदींसह शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.
पदयात्रा रेल्वे स्टेशन रोड, डॉक्टर जाजू हॉस्पिटल, सद्भावना चौक, डाॅ.आंबेडकर चौक, मेन रोड वरोरा, मिलन चौक येथून पुढे शगुन हाॅल येथे समारोप झाला.
यावेळी नानाभाऊ पटोले यांनी भाषणात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यासारख्या समस्यांचा सामना जनतेला करावा लागत आहे.
पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांवर लढणार आहे. पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे.
यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले यांनीही भाषण केले.
वरोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा शहर अध्यक्ष विलास टिपले, भद्रावती तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे, बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, विशाल बदखल, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम,डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डाॅ. हेमंत खापणे,माजी सभापती छोटुभाई शेख,विधानसभा युवक अध्यक्ष शुभम चिमूरकर ,माजी उपनगराध्यक्ष अनिल झोटिंग, प्रविण काकडे,माजी नगरसेवक राजू महाजन,सन्नी गुप्ता, राहुल देवडे,
महिला काँग्रेस अध्यक्ष ऐश्वर्या खामकर, शहराध्यक्ष दिपाली माटे,रत्ना अहिरकर, भद्रावती तालुकाध्यक्ष वर्षा ठाकरे, शहराध्यक्ष सरिता सूर,मनोज दानव,निलेश भालेराव, सुभाष दांदडे,फिरोज पठाण,काँग्रेस पदाधिकारी सुधीर मुळेवार, रवींद्र धोपटे, हरीश जाधव ,चंदू दानव, ईस्तेखां पठाण,सुरेश टेकाम,अमर गोंडाणे, पुरुषोत्तम पावडे, सुनंदा जीवतोडे, धम्मकन्या भालेराव,चेतना शेट्ये,देवानंद मोरे,अनिल चौधरी, पद्माकर कडूकर,मनोहर स्वामी,किशोर डुकरे,उमेश देशमुख,अमोल सेलकर, सलिम पटेल, अरुण बर्डे, सुजीत कष्टी, प्रकाश शेळकी, योगेश खामनकर,गिरीधर कष्टी,दिवाकर निखाडे ,पुरुषोत्तम निखाडे, ग्यानिवंत गेडाम, सारिका धाबेकर, देवानंद मोरे ,रुपेश तेलंग, अनिरुद्ध देठे,मयुर विरूटकर, सुरज बावणे, विलास गावंडे, महादेवाचे आसेकर, पुरुषोत्तम कुडे, गणेश मडावी,गणेश काळे यांच्यासह शेकडो पदाधीकारी सहभागी झाले होते.