धानोलीत 300 गुरांना ‘लंपी’ लसीकरण

by : Shankar Tadas

कोरपना :

२२/८/२०२३ रोज मंगळवार ला पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ पिंपर्डा अंतर्गत धानोली तांडा व धानोली इथे लंपी चर्मरोग रोगाचे पशुशिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३०० पशूंना लंपि चर्मरोगाचे लसीकरण करण्यात आले. त्यात बैल १२४, गाय ८०, वासरे ९६ असे ऐकून ३०० जनावरांना लसीकरण करण्यात आले. काही जनावरांवर औषधोपचार करण्यात आले तसेच पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाच्या योजनेची माहिती देण्यात आली. या शिबिराकरिता ग्रामपंचायत धानोलीचे उपसरपंच श्री ओम प्रल्हाद पवार, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. एच. डी. डेंगळे, पशुधन पर्यवेक्षक पिंपर्डा तसेच सहायक म्हणून विजय तिरानकार डिप्लोमाधारक तसेच अशोक रोगे परिचर पिंपर्डा तसेच गावातील नागरिक व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here