डॉ. दिलीप बलसेकर यांची सिटी शाळा समूह संकुलास भेट

by : Priyanka Punvatkar

चंद्रपूर :

डॉ. दिलीप बलसेकर, मुख्य संपादक आणि सचिव, दर्शनिका विभाग (महाराष्ट्र राज्य) यांनी चांदा शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सिटी शाळा समुह संकुलातील सिटी हायर सेकंडरी स्कूल, हिंदी सिटी हायर सेकंडरी स्कूल तसेच सिटी कन्या विद्यालय येथे सदिच्छा भेट देत सदर शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला. यावेळी श्री प्रभाकर गवळी, उपसंपादक दर्शनिका विभाग (महाराष्ट्र राज्य) तसेच श्री अशोक सिंह ठाकुर, संपादक मंडळ सदस्य, दर्शनिका विभाग (महाराष्ट्र राज्य) प्रामुख्याने उपस्थित होते. श्री अशोक सिंह ठाकुर यांनी डॉ. दिलीप बलसेकर यांना १९३९ साली स्थापन झालेल्या चांदा शिक्षण मंडळ आणि अंतर्गत शाळांच्या गौरवशाली इतिहासाचा परिचय करून दिला. यावेळी त्यांनी सिटी हायर सेकंडरी स्कूल चे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक दिवंगत श्री डि. बी. देव यांचा विशेष उल्लेख केला. विशेष बाब म्हणजे संस्थेच्या नवीन इमारतीची कोनशिला १९५६ साली तत्कालीन स्वास्थ्य मंत्री (मध्य प्रदेश) मान. मा. सा. कन्नमवार यांच्या हस्ते स्थापित करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here