लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि १९ ऑगस्ट.रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स महाविद्यालय, महालण विभाग, फुंडे च्या प्राणिशास्त्र विभाग व फ्रेंड्स ऑफ नेचर च्या वतीने छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई येथील विद्यार्थ्यांसाठी सर्प साक्षरता अभियान घेण्यात आले. नुरा शेख ह्यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.तर प्राचार्य अरूण घाग यांनी मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीर वाजेकर कॉलेजचे प्राणिशास्त्र विभाग प्रमूख, डॉ आमोद ठक्कर यांनी केले त्यात त्यांनी सर्प त्यांची संख्या, विषारी बिन विषारी व निमविषारी असतात ह्याची माहिती दिली. सर्प दंश मुळे साधारणतः सरकारी आकड्यांनुसार दर वर्षी ६० हजार मृत्यू होतात नोंद नसलेली आकडेवारी आणखीन मोठी आहे. हे मृत्यु अनेक वेळेस अज्ञान, अंधश्रद्धा चुकीच्या उपचार पद्धती चा वापर किंवा वेळेत योग्य उपचार न मिळणे अशी अनेक कारणे आहेत जी आपण सर्प साक्षरतेचे धडे घेऊन सर्प दंश शुन्य मृत्यू अभियानाला हातभार लावुन कमी करावे असे आवाहन केले.प्रमुख वक्ते फ्रेंडस ऑफ नेचरचे जयवंत ठाकूर ह्यांनी विषारी सर्प नाग, मण्यार, घोणस, फुरसे, चापडा, समुद्र सर्प यांना कसे ओळखायचे, त्यांचा खुराक सवयी इत्यादींची सविस्तर माहिती दिली. तसेच निमविषारी व अनेक बिनविषारी सर्प ह्यांची ही सचित्र ओळख करून दिली. सर्प मानवाचा मित्र कसा आहे ह्याची विस्तृतपणे माहिती करून दिली. सर्प दंश होऊच नये ह्यासाठी घ्यावयाची काळजी ही माहीत करून दिली. सर्पदंश झाल्यावर प्राथमिक उपचार कसे करावेत व तात्काळ वैद्यकीय उपचाराची आवश्यकता का आहे व ती मिळेपर्यंत घ्यावयाची काळजी प्रात्यक्षिक सहित दाखवली जेणेकरून सर्प दंश शून्य मृत्यू अभियान यशस्वी होईल असे सांगितले. कार्यक्रमाच्या नियोजनात शाळा विकास समितीचे अध्यक्ष तथा कामगार नेते सुरेश पाटील ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. पंकज भोये,निकेतन ठाकूर, माजी विद्यार्थी आणि फॉन (फ्रेंड्स ऑफ नेचर )संस्थेचे पदाधिकारी,सदस्य ह्यांचे सहकार्य लाभले. शुभांगी ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले.जासई शैक्षणिक संकुलातील पर्यवेक्षक जितेकर मॅडम, मोकल मॅडम, बाबर मॅडम, हुद्दार मॅडम व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.