देऊळगाव राजा येथे विद्दुत वितरण कंपनी च्या वतीने ग्राहक सुसंवाद व तक्रार निवारण मेळावा चे आयोजन ,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी उपविभाग देऊळगाव राजा च्या वतीने उपविभागीय कार्यालय, देऊळगाव राजा येथे 18 ऑगस्ट ला सकाळी 11 ते 5 च्या दरम्यान ग्राहक सुसंवाद व तक्रार निवारण मेळावा चे आयोजन करण्यात आले होते,
तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक वित्त व लेखा विकास बांबल ,उपकार्यकारी अभियंता संदीप शेटे,निलेश लंके व इतरांनी केले,
या मेळाव्यात ग्राहकांच्या विविध प्रकारच्या समस्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या, व बऱ्याच समस्या दूर केल्या,व काही समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले,
याप्रसंगी महावितरण च्या मोबाईल ऍप बाबतीत माहिती दिली, ऑनलाइन बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले,
यावेळी भरत गुप्ता, गजानन पुजारी,प्रशांत देशमुख, किरण एंडोले, प्रफुल्ल सारडा प्रामुख्याने उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *