पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची होळी करून निषेध ————————–

 

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : महाराष्ट्र राज्यात पत्रकार हल्ला विरोधी कायदा झाला मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांनी राज्य शासनाच्या निषेधार्थ पत्रकार हल्ला विरोधी कायदाची होळी केली. यावेळी सदर कायद्याची अंमलबजावणी साठी गृह विभागाला तात्काळ सूचना द्या अशी मागणी करण्यात आली.
मागील आठवड्यात पाचोरा जिल्हा जळगाव येथील पत्रकारावर हल्ला झाला.शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्या संदर्भात संबंधित कार्यकर्त्यांवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या कलम लावण्यात आल्या नाही. राज्यात कुठेही पत्रकारांवर हल्ला झाल्यास पोलिसां कडून सदर कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या प्रतींची होळी करून निषेध नोंदविला. तदनंतर तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले,सदर आंदोलनात तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके, व्हॉइस ऑफ मीडियाचे जि.उपाध्यक्ष मुशिर खान कोटकर, जिल्हा सदस्य,सुषमा राऊत, संघटनेचे सचिव सुरज गुप्ता, उपाध्यक्ष मंगेश तिडके,अर्जुन आंधळे,शिवाजी वाघ,प्रभाकर मांटे,संतोष जाधव,राजेश पंडित,पूजा कायंदे,मुन्ना ठाकूर,अशोक जोशी,मुबारक शहा,चंद्रभान झिने,विजय जाधव आदी पत्रकारांनी सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here