लायन्स क्लब सावर्डे च्या वतीने अती कुपोषित बालकांस पोषक आहार आणि औषधाचे वाटप*

लोकदर्शन.सावर्डे 👉-गुरुनाथ तिरपणकर

सावर्डे: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य प्रकल्प क्रमांक दोन मधील सहा अती कुपोषित बालकांस पोषक आहार आणि औषधाचे वाटप लायन्स क्लब सावर्डे च्या वतीने करण्यात आले.
लायन्स क्लब सावर्डे च्या वतीने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी राष्ट्रीय बाल स्वास्थ प्रकल्प प्रमाणित क्रमांक दोन चिपळूण विभागातील सहा अति कुपोषित बालकास पोषक आहार, आरोग्य विभाग मान्यता प्राप्त औषधे, प्रथिने आणि सद्गुरु श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर यांच्या संशोधनातून बनवलेले मोदामृत हे वजन वाढण्याचे संयुज याचे वाटप सावर्डे मधील केदारनाथ बहुउद्देशीय हॉल येथे करण्यात आले. सदर उपक्रमावेळी प्रकल्प क्रमांक दोन सीडीपीओ सौ प्रीती शिगवण मॅडम, अंगणवाडी सेविका सुपरवायझर रावनंग मॅडम आणि कांबळे मॅडम तसेच विविध भागातील अंगणवाडी सेविका, डॉ. दर्शन खोत, डॉ. आपटे मॅडम, वैद्य सत्यजित एकांडे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना अध्यक्ष ला. डॉ निलेश पाटील यांनी हा उपक्रम असाच पुढे चालू ठेवू असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन खजिनदार ला. अरविंद भंडारी यांनी केले. सदर कार्यक्रमाला ला डॉ वर्षा खानविलकर, ला सतीश सावर्डेकर, ला डॉ कृष्णकांत पाटील, ला. राजेश कोकाटे, MJF ला संजय कोकाटे , ला सीताराम कदम , ला. विनय कदम आदी लायन्स क्लब सावर्डे चे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here