चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौकात स्वातंत्र्यदिन साजरा*

 

लोकदर्शन 👉 प्रतिनिधी

*चंद्रपूर* (15 ऑगस्ट 2023) :
चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौकात भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा देदीप्यमान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील 76 व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यानिमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या वतीने गांधी चौक येथे ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या हस्ते महानगरपालिका आवारातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

महात्मा गांधींच्या विचारधारेला अनुसरून स्वातंत्र्य, लोकशाही आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे पालन करण्यासाठी काँग्रेस कमिटीची बांधिलकी यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. गांधी चौकातील हा उत्सव भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या असंख्य बलिदानाची आठवण करून देणारा ठरला.

चैतन्यमय आणि देशभक्तीच्या वातावरणात, जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महिला काँग्रेस, युथ काँग्रेस, NSUI, ओबीसी विभाग, अनुसूचित विभाग, अल्पसंख्यांक विभाग, इंटक, प्रोफेशनल काँग्रेस, पर्यावरण विभाग व इतर सर्व विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here