लोकदर्शन 👉 मोहन भारती
दिनांक 12 ऑगस्ट 2023 ला जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे ग्राम गीता जीवन विकास परीक्षा गुरुकुंज आश्रम मोजरी अंतर्गत मागील सत्रात घेण्यात आलेल्या विविध परिक्षेकचे प्रमाणपत्र आणि मोफत गणवेश योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणेशाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी आणि बक्षीस वितरक म्हणून शाळा व्यवस्थापन समिती चे सन्माननीय अध्यक्ष श्री. नारायण जी हिवरकर , शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. के. शुक्ला, जेष्ठ शिक्षक श्री. विठ्ठल मडावी सर, श्री. संजय डोए सर, श्री. प्रफुल जीवने, श्री. सुरज जुनघरी, कु. प्रियंका भगत, कु. रोहिणी आडे, श्री. संजय मनवर, सौ . तारा मेश्राम इत्यादी उपस्थित होते.
आपल्या प्रमुख अतिथी च्या भाषणात श्री. नारायण जी हिवरकर यांनी शाळेच्या विशेष प्रगती आणि सदर परीक्षेत 68 विद्यार्थी सहभागि झाल्याबद्दल शाळेचे कौतुक केले, तसेच विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात यशस्वी होऊन देशाच्या प्रगती मध्ये मोलाचे सहकार्य करावे व आपल्या शाळेचा, आपल्या गावाचा, आणि आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असे संबोधित केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रफुल जीवने सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. विठ्ठल मडावी सर यांनी केले.