लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा (ता. प्र) :– चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्व आणि कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करित कोहपरा येथील भाजप व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये कोहपरा भाजपचे नेते तथा ग्रामपंचायत चे सरपंच राकेश दिलीप मेश्राम, उपसरपंच पुजाताई शेषराव मडावी, ग्रा प सदस्य मायाताई गणेश फोपरे, ग्रा प सदस्य संजय मुसळे, गणेश फोपरे, प्रभाकर कानमपल्लीवार, गणेश मडावी, शेषराव मडावी, विनोद कोडापे, प्रज्वल मडावी, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तथा ग्रा. प सदस्य पुष्पा मंडरे यासह अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सर्वांना आ. धोटे यांनी काँग्रेस पक्षाचा दुप्पटा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन पक्षप्रवेश दिला. सर्वांचे अभिनंदन केले.
राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने राजुरा तालुक्यातील मौजा विहिरगाव येथे कार्यकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरील सर्वांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसच्या वतीने कोहपरा गावात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आपल्या मार्गदर्शनात आ. धोटे म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांच्या बलिदान व त्यागामुळे, काँग्रेसच्या विविध विकासात्मक धोरणांमुळेच भारत देशाला सशक्त आणि बलशाली स्वरूप आले आहे. मात्र भाजप सरकारने खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवून आज देशात भष्टाचार, दुराचार, अत्याचार, अराजकता माजवली आहे. यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील जनता महागाई, बेरोजगारी व इतर अनेक समस्यांनी होरपळत आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात सत्ता बदल केल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही याची मला खात्री आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावागावात सर्व सामान्य जनतेत जनजागृती करून त्यांच्या समस्या, व्यथा सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. तर कार्यकर्ते हेच पक्षाचे बलस्थान असून पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसह गावातील सर्व नव्या जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा पुर्ण प्रयत्न आपण करू अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कृ. उ. बा. स. चे सभापती विकास देवाळकर, यु. काँ. चे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, यु. काँ चे तालुकाध्यक्ष इर्षाद शेख, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, सरपंच रामभाऊ देवईकर, उपसरपंच निलकंठ खेडेकर, सरपंच अमित टेकाम, उपसरपंच सुधाकर धानोरकर, सरपंच शोभा मडावी, सरपंच धनराज रामटेके, उपसरपंच आकेश चोथले, सर्वानंद वाघमारे, सुरेश पावडे, विनायक सोयाम, मनोहर धुळसे, संजय कुळमेथे, विजय पिंगे, सुनिल पिदुरकर, पुरुषत्तम पिंगे, आनंदराव गावंडे, मारोती वांढरे, केशव बोढे, मदन कुळमेथे, विद्या पिदुरकर, वर्षा पिंगे यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.