लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात दिनांक १0 आगस्ट २०२३ रोज गुरूवारला डॉ एस. आर रंगनाथन यांची १३१ वि जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात आला.. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ पंकज कावरे ग्रंथपाल महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर व श्री मंगेश करंबे ग्रंथपाल शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूर हे मार्गदर्शक होते. कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री मनोहर बांद्रे यांनी केले. कार्यक्रमाचा विषय होता IMPORTANCE OF LIBRARY AND LIBRARIAN IN ACADEMIC PERSPECTIVE
प्राचीन काळापासूनआपल्या समाजामध्ये ज्ञानसंग्रहासाठी ग्रंथाचा उपयोग केला जातो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही ग्रंथाचे महत्व कमी झालेले नाही. ग्रंथालयात गेल्याशिवाय व ग्रंथाचा वापर केल्याशिवाय ज्ञानाची भूख भागवत येत नाही. ज्ञानाच्या उपासकाला त्याला हवे असलेल्या माहितीपर्यंत घेऊन जाण्यासाठी ग्रंथपालाची खूप मोठी भूमिका आहे. म्हणून शैक्षणिक दृष्टिकोनातून ग्रंथालय आणि ग्रंथपालाचे महत्व या विषयावर वक्त्यांनी आपले मत मांडले. या कार्यक्रमासाठी महाविदयालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा, मनोहर बांद्रे सरानी कार्यक्रमाचे संचालन केले तसेच सर्व पाहुण्यांचे, अध्यक्षाचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले.