by : Shankar Tadas
कोरपना : कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कारखान्यातून निघणाऱ्या प्रचंड धुरामुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शेतातील पिके आणि परिसरातील नागरिकांच्या आयोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी कंपनी व्यवस्थापनाला प्रदूषणाच्या या समस्येची त्वरित दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्यास भाग पडावे, अशी मागणी परिसरातील लोकांकडून होत आहे. 11 ऑगस्ट रोजी सकाळी कढोली खुर्द, बोरी नवेगाव, नारंडा येथील नागरिकांनी दालमिया सिमेंट कारखान्यातून काळाकुट्ट धूर मोठ्या प्रमाणात सोडला जात असल्याचे पाहिले. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून एकमेकांना शेअर केले. कंपनी व्यवस्थापनाने याबद्दल स्वतःच स्पष्टीकरण संबंधित ग्रामपंचायतिला कळवून परिसरातील प्रदूषणाबाबत काय उपाय केले जात आहेत याबद्दल माहिती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.