*लोकदर्शन.👉 *डॉ राजेश सोनुने(नागपूर जिल्हा प्रतिनिधी)* *9767355533*
नागपूर : दिनांक ::9ऑगस्ट 2023
धुळे (शिरपूर –तालुक्यातील खर्दे बु. येथील आरसी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नऊ ऑगस्ट क्रांती दिवस व विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारकाच्या प्रतिमेचे पूजनाने झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी व्ही पाटील होते. नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रम तीन गटात घेण्यात आला. यामध्ये एकूण 32 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पी. व्ही .पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व पटवून दिले.
देशभक्तीपर गीतांचे परीक्षण विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका एस. जे. सूर्यवंशी व डी. डी. जाधव यांनी केले. या स्पर्धेत प्रथम गटात इयत्ता पाचवी ते सातवी पुढील प्रमाणे
प्रथम सोनवणे जय सुनील
द्वितीय बोरसे ओम किशोर
तृतीय बाविस्कर कृष्णा दिनेश
दुसऱ्या गटातील इयत्ता आठवी ते दहावी पुढील प्रमाणे प्रथम पटेल उन्नती किरण
द्वितीय मराठे निहाल हिरालाल
तृतीय मराठे मनीष, बोरसे सरिता
तिसऱ्या गटातील इयत्ता अकरावी ते बारावी विद्यार्थी पुढील प्रमाणे
प्रथम पारधी संदीप मनोहर
द्वितीय कोळी पूजा दिनेश
तृतीय पटेल विशाखा तुंबेश
यांनी मिळविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.जे. पाटील यांनी केले .तर आभार प्रदर्शन अमोल सोनवणे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य पी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी. बी. धायबर, वाय. डी. मीठभाकरे,पी. एस. अटकळे, श्रीमती एस .जे.सूर्यवंशी, श्रीमती एस. आर .निकम, श्रीमती एम. एन. पाटील,बी.एस. बडगुजर, डी. एम .पवार, अमोल सोनवणे डी.डी. जाधव,बी.एस. पावरा,
तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.