हनुमान देवाचा महाअभिषेक सोहळा.

 

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि ९ जुलै उरण तालुक्यातील करंजा कोंढरी गावचे आराध्य दैवत श्री हनुमान देवतेच्या मूर्तीचे ६ मे २०२३ रोजी एका समाजकंटकांने विटंबना केले होती.त्यानंतर संपूर्ण ग्रामस्थ यांनी ब्राह्मण सल्ल्यानुसार देवाचा अखंड सप्ताह नाम जप केले होते. त्यानंतर नुकताच संपूर्ण शास्त्रीय विधी नुसार देवाला शेंदूर लेपनाचा कार्यक्रम दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आला. आणि शेंदूर विसर्जन खोल समुद्रात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.आता येत्या २१ ऑगस्ट २०२३ रोजी देवाचा महाअभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याला मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गावचे अध्यक्ष प्रकाश पाटील व कमिटी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here