लोकदर्शन डोंबिवली 👉गुरुनाथ तिरपणकर
कोष्टी समाज महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरी आपल्या कुटुंबासहीत स्थिरावला आहे. डोंबिवलीतही गेली ३५वर्षे कोष्टी समाज सेवा मंडळ कार्यरत आहे. त्याच अनुषंगाने नुकताच शुभ मंगल कार्यालय,भाजी मार्केट जवळ, डोंबिवली (पुर्व) येथे कोष्टी समाज सेवा मंडळाचे ३५वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले होते. कार्यक्रमाची सुरूवात चौंडेश्वरी देवीच्या पुजनाने झाली.त्यानंतर समाजातील मुला-मुलींचे नृत्याविष्कार सादर करण्यात आले. तसेच सदाबहार गायनाने कार्यक्रमात अजुन रंगत आणली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कोष्टी समाज मंडळ, मुंबईच्या कार्याध्यक्षा,देवांग कोष्टी समाज युवा आणि महिला मंडळ कुर्ला येथे गेली ३९वर्षे कार्यरत असणा-या, विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीच्या महाराष्ट्र विणकर सदस्या व SBC लढ्यासाठी कार्यरत असणा-या रणरागीणी सौ.विजयमाला वाघ, तसेच सह-संचालक,शिकवणी कोचिंग अॅकडमी लोहगाव पुणे,गेली १४वर्षे विद्यार्थी-पालक यांचे समुपदेशक,विद्यार्थी विकास कार्यक्रम आयोजक विद्यार्थी मित्र दिपक राणे यांचे मंडळाच्या अध्यक्षा अनिता वाघावकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल ससाणे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय शशिकला ताई दिवटे व दत्ता कडुलकर यांनी करुन दिला. मंडळाच्या अध्यक्षा अनिता वाघावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.जयश्री रोकडे यांनी इतिवृत्त वाचन केले.ताळेबंद खजिनदार प्रशांत खोचे व सह खजिनदार दत्ता कडुलकर यांनी सादर केला.कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी विजयमाला वाघ यांनी देवांग कोष्टी समाज युवा आणि महिला मंडळ कुर्ला यांच्या माध्यमातून गेली ३९वर्षे मंडळ कसे कार्यरत आहे याची सविस्तर माहिती दिली.आणि आरक्षण टिकविण्यासाठी सर्व समाज बांधवानी SBC लढ्यासाठी कार्यरत राहीले पाहीजे हे आवर्जून सांगितले.तसेच कोष्टी समाज संदर्भातील विविध पैलूंवर आपले प्रकट विचार मांडले.तसेच प्रमुख पाहुणे दिपक राणे यांनी पालक आणि पाल्य यांचे नातेसंबंध कसे असावेत,पालक म्हणून आपली जबाबदारी काय आहे, मोबाईलचा अति वापर, विद्यार्थ्यांची मानसिकता व त्यातील बदल अशा विविध पैलूंवर उदाहरणासहीत आपले उदभोदक विचार मांडले.यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी -विद्यार्थिनींना व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिलिंद रोकडे यांनी केले व विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे सुत्रसंचालन शिल्पा वाव्हळ यांनी केले.आभार राजन बुचडे यांनी मानले.कोष्टी समाज सेवा मंडळाच्या सर्व साधारण सभेस व वार्षिक स्नेहसंमेलनास कोष्टी समाज बंधु-बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.