लोकदर्शन 👉 प्रा. गजानन राऊत
विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील डिस्क्रिमिनेशन विभाग, मराठी विभाग, इतिहास विभाग आणि अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही यांच्या वतीने स्त्री पुरुष समानता या विषयावर विद्यार्थी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.कार्यशाळेत आज आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा कशाप्रकारे दुय्यम आहेत. या संदर्भात विस्तार पूर्वक चर्चा करण्यात आली. संसाररुपी व समाजरुपी गाड्यांचे स्त्री आणि पुरुष हे दोन चाक असून कोणतेही एक चाक कमजोर झाले तर त्याचा परिणाम सर्व व्यवस्थेवर नक्कीच होतो आणि प्रगती खुंटते. आज बऱ्याच क्षेत्रात स्त्रियांनी आपले वर्चस्व सिद्ध करून आपली पात्रता दाखवून दिली आहे. त्यात कार्पोरेट क्षेत्र, शिक्षण क्षेत्र यामध्ये आजही स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. परंतु अजून बऱ्याच क्षेत्रात महिलांचा सहभाग अल्पसा आहे महिलांना मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय त्या क्षेत्राची प्रगती होणार नाही. तसेच विविध क्षेत्रात काम करताना स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी ही वेगळी असते, ती पण मानव आहे, ही भावना हृदयी असणे गरजेचे आहे. याकरिता मुख्य मार्गदर्शक श्री बाबिलवार सर जेंडर ट्रेनर अंबुजा सिमेंट फाउंडेशन यांनी विविध खेळाच्या व उदाहरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्त्री-पुरुष समानतेचे महत्व व गरज समजावून सांगितली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. श्री देशमुख सर इंग्रजी विभाग प्रमुख आणि श्री प्रफुल विधाते अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राऊत यांनी तर आभार प्रा. डॉ.पानघाटे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.