लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राजुरा तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत सर्वाधिक गुणांनी शाळेतुन उत्तीर्ण होणा-या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार तक्षशिला नगर बामणवाडा येथे दिनांक ६ आॅगष्ट २०२३ रोजी विक्रमशिला बहुउद्देशिय संस्था तक्षशिला नगर बामणवाडाच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह तक्षशिला नगर बामणवाडा येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटक आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. धोटे यांनी सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांना शाबासकी दिली, त्यांचे कौतुक केले. यापुढेही आनखी जिद्दीने मोठे यश प्राप्त करा, आपण ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करा, यश तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होईल असे सांगितले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रमशिला बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष अमरदीप वनकर होते तर प्रमुख मार्गदर्शक मसुद अहेमद सचिव समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था राजुरा तर प्रमुख पाहुणे म्हणुन सर्वानंद वाघमारे अध्यक्ष समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था राजुरा तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन दिनकर कर्नेरवार अध्यक्ष काॅंग्रेस सेवादल व ज्येष्ट नागरिक जगन्नाथ पुणेकर उपस्थित होते.
यावेळी इयत्ता १०मधुन शाळेतुन प्रथम आलेल्या कु.वंशिका विकास भंडारवार,,राजेंद्र रंजन लांडे,सुरज बंडू रागीट,कु.भुमिका ज्ञानेश्वर डाहुले,श्रावणी विनायक नरखेडकर,कु.श्रेया चंदन पुणेकर,कु.कस्तुरी रंविद्र बेले,कु.प्रतिक्षा रामदास देवाळकर,प्रियांशू शत्रूघ्न भगत,कु.भुमी गुरुदास उपासे ,चैताली अशोक वांढरे,कु.उत्कर्षा मारोती बोटरे,कु.समिक्षा साईनाथ वडस्कर,कु.पल्लवी किर्तिमान होकम,कु.आचल राजेंद्र कांबळे ,कु.श्रूती प्रकाश बोरकर,कु.आकांक्षा मोरेश्वर जेऊरकर ,यश रमेश इग्रपवार,कु.सानिया बानो अजमत अली,अतिश रविंद्र नेवारे तसेच इयत्ता १२ वी मधुन कु.खुशी बंडू मडावी,कु.महेविश शौकत अली सय्यद,पल्लवी सुभाष पिंपळकर,कु.श्रेया मनोहर वाघमारे,कु.हिमांशी विलास निवलकर ,क्रांती लक्ष्मण निरांजने,कु.अपुर्वा कर्मविर टिपले,सुमेध सुरेश वेल्हेकर,कु.शितल नागोबा गिरसावळे ,शरद बापू नेवारे ,धनराज रमेश क्षिरसागर,कु.तेजस्वीनी इंद्रजित खौब्रागडे,कु.समिक्षा रघुदास मडावी,करण चंद्रशाह तोरे,हर्षल जंगू मडावी या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन धनराज दुर्योधन संचालक विक्रमशिला बहुउद्देशिय संस्था तर प्रास्ताविक संस्थेचे सचिव भारत फुलझेले तर आभार संस्थेचे सहसचिव गोकुलदास पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष लालचंद वाघमारे ,संस्थेचे कोषाध्यक्ष मिंलिंदकुमार ढोणे,संस्थेचे संचालक सूरेश जीवने,निवारण कांबळे,प्रभाकर खोब्रागडे,कर्मवीर टिपले, मारोती घागरगुंडे,राजू गायकवाड यांनी परिश्रम घेतले.