जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न

 

लोकदर्शन जील्हाप्रतिनिधी👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर दिनांक ६ जुलै २०२३
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल पालकांच्या समोर या पालक सभेच्या माध्यमातून मांडण्यात आला निपुण भारत अभियान अध्ययन स्तर निष्पत्ती यानुसार विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती हे पालकांच्या लक्षात आणून देण्यात आली निपुण भारत अंतर्गत विद्या प्रवेश या उपक्रमाबाबत सर्व पालकांना माहिती देण्यात आली तसेच सेतू अभ्यासक्रमाच्या संदर्भात देखील पूर्व चाचणी व उत्तर चाचणी यांचा आलेख यांना समजून सांगण्यात आला या पालक सभेच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीराम पाच भाई होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्रीराम भोंगळे गुरुजी हे होते पालक सभेला शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक सखाराम परचाके यांनी मार्गदर्शन केले ,सध्या या शाळेत वर्ग 1 ते 8 पर्यंत असून 168 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तसेच या शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी देखील या मराठी शाळेत दाखल झाले आहेत,शाळेमध्ये सुरू असलेल्या विविध शासनाच्या योजना जसे की मोफत गणवेश शालेय पोषण आहार सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा निपून भारत अभियान व पीएम श्री योजना याविषयी सविस्तर माहिती दिली यावेळी पालक व माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पालक सभेच्या यशस्वी ते करिता विषय शिक्षक श्री शिवाजी माने कुमारी पुष्पा इरपाते अनिल राठोड काकासाहेब नागरे व नितीन जुलमे यांनी सहकार्य केले
,

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *